प्रथम तीर्थ मग प्रसाद असे तीर्थप्रसादाचे हिंदू संस्कृतीत महत्त्व आहे. देवाला या पाच पदार्थांनी स्नान घातल्यास ही पूजा पंचामृति पूजा अशी म्हटली जाते. गणपती बाप्पाला तर ही पूजा खूप आवडते अशा पाच पदार्थांचे पंचामृत मांगल्य व पावित्र्याने भरलेल्या असते म्हणूनच यास तीर्थ म्हणतात.

गणेशपुजा असो वा सत्य नारायण सर्व पुजा पंचामृत अर्थात तीर्थाशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत. दुधाची शुद्धता, दह्याची संपन्नता, मधाचा गोडवा, साखरेचा आनंद व तुपाचे श्रेष्ठत्व आणि या पाच पदार्थांचा पवित्र संगम म्हणजे पंचामृत. पंचामृत हे भारतीय संस्कृतीत अत्यंत महत्त्वाचे आणि पवित्र मानले जाते. पंचामृत बनवण्यासाठी सोपे परंतु त्याचे लाभ अत्यंत उत्कृष्ट आहे. पंचामृताच्या निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या घटकांचे विविध कारणांसाठी वेगळे महत्व आहे आणि त्यांचे औषधी गुणधर्म अत्यंत उत्कृष्ट आहेत.
पंचामृताचे फायदे :
पंचामृत हे पाच मुख्य पदार्थांचे मिश्रण आहे जे सातत्याने सेवन केल्यास शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यात सुधारणा होते. याच्यात दही, दूध, तूप, मध आणि साखर इ. पाच मुख्य पदार्थांसोबत लोणी, तुळशीची पाने, केशर यांचाही समावेश असतो. ह्या पदार्थांच्या मिश्रणातून शरीराला विविध पोषणाची तत्त्वे मिळतात आणि ते स्वास्थ्यासाठी फायदेशीर असतात.
- शारीरिक लाभासाठी पंचामृतातील घटक पदार्थ अत्यंत लाभकारी आहेत. तुळशीची पाने आणि दह्यामध्ये असलेले एंटीऑक्सिडंट्स शरीराच्या संरक्षणास महत्त्वाचे आहेत आणि रोगप्रतिरोधक क्षमतेत वाढ होते.
- मानसिक तणाव निवारण: पंचामृतातील पदार्थ तुळशीची पाने आणि दूधामुळे मानसिक तणाव कमी होतो. त्यामुळे मानसिक स्थिती सुधारते आणि मन प्रसन्न राहते.
- प्राणवायु शुद्धी: पंचामृतामधील घटकांमुळे शरीरातील अशुद्ध प्राणवायूंची शुद्धी होते.
पंचामृत बनवण्याचा विधी :
पंचामृत बनवणे अगदी सोपे आहे.पंचामृत बनवण्यासाठी अर्धी वाटी फेटलेलं दही, एक कप दूध, दोन चमचे साजुक तूप, दोन चमचे साखर आणि एक चमचा मध. सर्व प्रथम एका भांड्यात दही फेटून घ्या. फेटलेलं दही एका फुलपात्रात घ्या. वरून त्यात दूध घाला. साखर घाला, थोडसं मध घाला आणि शेवटी साजूक तूप घाला. हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या. आवडीप्रमाणे केसर, केळाचे काप आणि तुळशीपत्रही तुम्ही या तीर्थात घालू शकता. तयार झालं पंचामृत.
पंचामृताचा कोणाला लाभ होतो
पंचामृताचा उपयोग सर्वांसाठी फायदेशीर आहे. विशेषत: आरोग्याच्या दृष्टीने कमजोर आणि बालवान लोकांसाठी ह्या प्रसादाचा वापर फायदेशीर असतो.
अशा प्रकारे, पंचामृत हा एक विशेष औषध आहे ज्याचे सेवन केल्याने आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यामध्ये लाभ होतो.